शेंदुर्णी – जळगाव जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अश्या श्री त्रिविक्रम मंदिर देवस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त आज दि.17 रोजी रात्री १२ वाजता श्री त्रिविक्रम महाराज्यांच्या मूर्तीला महाअभिषेक होत असून ही महापूजा मान्यवर अतिथी यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,भाजपा पदाधिकारी गोविंद अग्रवाल,संजय गरूड ,शेंदुर्णी नगर पंचायत लोकनियुक्त अध्यक्षा ,स्थानिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी,देवस्थान समिती
पदाधिकारी ॲड.देवेंद्र पारोळकर यांचे सह अन्य मान्यवरही उपस्थिती राहणार आहे.
शेंदुर्णी येथील या प्रसिद्ध अतिप्राचीन देवस्थानाचे एक वेगळेमहत्व आहे.अतिशय जागृत देवस्थान म्हणून हे स्थान ओळखले जाते.शेंदुर्णी येथून १५ किमी परिसरातील गावांमधून निघालेल्या दिंड्या,पालख्या येथे आषाढी एकादशीला पोहचतात.मार्गक्रमण करत असताना ह्या दिंड्यांचे स्वागत ठीकठिकाणी होत असते सहभागी वारकरी,भाविक भक्तांना चहापाणी,फराळ अशी व्यवस्था त्या परिसरातील दानशूर व्यक्तीकडून केली जाते.अश्या बऱ्याच परिवारात ही परंपरा सांभाळली जात आहे.
आषाढी एकादशीच्या पहाटे पासून दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात.सुमारे २ ते ३ किमी अंतरापर्यंत ह्या रांगा पोहचलेल्या असतात.
प्रतिवर्षी सुमारे २ लाख भाविक येथे दर्शनाचा लाभ घेतात.शेंदुर्णी येथे प्रति पंढरपूरस्वरूप या आषाढी
एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्त अनुभवत असतात.तरी जिल्हाभरतील श्रद्धाळू भाविक भक्तांनी यानिमित्ताने दर्शनाचा लाभ घ्यावा देवस्थानाला भेट द्यावी.असे आवाहन संस्थांना तर्फे पदाधिकारी यांनी केले आहे.