जळगांव – जळगाव शहरापासून लगतच्या पिंप्राळा येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त रथोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.विविध भागातून भाविकभक्त याठिकाणी आ्वर्जून उपस्थिती देवून दर्शनाचा लाभ घेत असतात.
यंदाच्या वर्षी देखील या उत्सवाची जय्यत तयारी विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ, व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रथोत्सव समिती कडून करण्यात आली आहे.
रथ मार्गावर विद्युत रोषणाई
पिंप्राळा येथील या प्रसिद्ध रथ उत्सवाची शोभा वाढावी या दृष्टीने जळगाव शहर महापालिकेच्या वतीने संपूर्ण रथमार्गावर विद्युत रोषणाईसह हॅलोजन लाईटची
व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे भाविक भक्तांना रात्री 10 वाजे पर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रथ मार्गावरील साफ सफाईचे काम पूर्णत्वाला गेले असून रथ मार्गावर
विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पूजेला मान्यवर उपस्थित राहणार
बुधवार दि.17 जुलै रोजी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जानाऱ्या पिंप्राळा येथील रथ उत्सवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम
आषाढी एकादशी निमित्त सकाळी 5 वाजता महाअभिषेक अक्षय वाणी यांच्या हस्ते होणार असून रथाची महापूजा सकाळी 11:30 वाजता कुलदीप पंडित यांच्या हस्ते संपत्ती करण्यात येणार आहे.
महाआरती कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची उपस्थिती
पिंपळा येथील या भव्य दिव्य कार्यक्रमात दुपारी बारा वाजता रथाची महाआरती मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे माजी खासदार उन्मेश पाटील करण पवार माजी महापौर जयश्री महाजन ,माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तरी सर्व पांडुरंग भक्तांनी, शहर वासियानी या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ, व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.