Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आभारप्रदर्शन

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आभारप्रदर्शन


मुंबई -वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनील पाटणकर,कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार,व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे,संजय पावशे,व गोपाळ चौधरी यांनी आभार मानले. हा विषय विधानसभेत सतत लावून धरत असल्याबद्दल ठाणेचे आमदार संजय केळकर यांचाही यावेळी सत्कार केला.

विधानसभेत दिलेले आश्वासनाप्रमाणे लवकरात लवकर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करु असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.

आज विधीमंडळात भारताचे उपराष्ट्रपती येणार होते. त्यामुळं कडक सुरक्षा होती. मुख्यमंत्री महोदयांची भेट होणं अशक्य वाटत होते मात्र तरीही ठाण्याचे आमदार श्री केळकर यांनी विशेष परवानगीने संघटनेच्या शिष्टमंडळाला विधीमंडळात नेले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या