Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याभाजपा मंडळ क्रमांक २ संघटन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद :आमदार भोळेंसह पदाधिकाऱ्यांनी केले...

भाजपा मंडळ क्रमांक २ संघटन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद :आमदार भोळेंसह पदाधिकाऱ्यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

  1.  

जळगांव – भाजपा महानगर मंडळ क्रमांक २ च्या वतीने शहरातील जुने जळगाव परिसरातील भावसार मंगल कार्यालय येथे भाजपा महानगरच्या माध्यमातून पक्षाच्या बळकट संघटनकार्य अधिक मजबूत करण्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन आ.राजू मामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले होते.

या प्रसंगी व्यासपिठावर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकुंद मेटकर,उदय भालेराव,रेखा वर्मा,महानगर सचिव चित्रा मालपाणी,मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे
आदींची उपस्थिती होती.

पुढील काळातील जवळच येवून ठेपलेल्या विधानसभा
निवडणुकी दृष्टीने या मंडळ परिसरातील कार्यकर्त्यांच्या
समस्या,अडी अडचणी,तसेच पक्षाच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या योजना यशस्वी करण्याकामी
विविध उपाय योजना या सह अन्य विषयांवर चर्चा करण्यात येवून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.

प्रभावी मार्गदर्शन..वाढला कार्यकर्त्यांचा उत्साह…

यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विविध मुद्दे मांडले.बैठकीचे अध्यक्ष आ.राजू मामा भोळे यांनी आपल्या प्रभावी शैलीतून दिशादायक मार्गदर्शन करीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले.आगामी काळातील पक्षसंघटन बळकट होणे दृष्टीने सूचना दिल्या

संघटनात्मक बैठकीत सर्व महानगर, प्रदेश, मंडल,बुथ प्रमुख, वॉरीयर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे
यांनी आभारप्रदर्शन केले.या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या