जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल कांताई सभागृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्व. पं. वसंतराव चांदोरकर हे अभिजात संगीतात बखले घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होते. *देवगंधर्व भास्करबुवा बखले हे सौ. शिल्पा व सौ. सावनी चे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा *वारसा, किंवा विरासत* चा कॅनव्हॉस उलगडून दाखविणार आहेत पुण्याच्या या दोन प्रतिभासंपन्न भगिनी.
सौ. शिल्पा पुणतांबेकर व सौ. सावनी दातार कुलकर्णी
त्यांना तबला समीर पुणतांबेकर संवादिनी अमेय बिच्चू
पखवाज डॉ. राजेंद्र दूरकर.साथसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अनुभूती स्कूल च्या संचालिका सौ. निशाभाभी जैन व उमवी चे कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ.अनिल डोंगरे यांची.
चुकवू नये अश्या या मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानाने केले असून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन ने केले आहे.