डॉक्टर्स डे च्या निमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे सर्व डॉक्टर्सच्या सेवा कार्याला वंदन करण्यात आले.
आपल्या समाजातील स्व.डॉ. अविनाश आचार्य, वैद्य भालचंद्र जहागीरदार, डॉ. शरद केळकर, डॉ. सदाशिव आठवले, डॉ. चंद्रिका देसाई, डॉ. उषा आपटे, डॉ. अनिल आचार्य डॉ. उल्हास कडूसकर अशा अनेक निष्णांत डॉक्टरांचा वारसा लाभलेला आहे. त्यांनी सर्व समाजांची आदर्श सेवा केली आहे.
हा समृद्ध वसा पुढे नेणारे डॉ. गिरीश सहस्रबुद्धे यांनी या लोकिकात भर घातली आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून अत्यल्प फी… कमी खर्चिक औषधी… अकारण चाचण्या टाळणे या त्रीसूत्रीवर सेवा व्रताने ते मार्गक्रमण करीत आहेत. दिवसेंदिवस इलाज महागडा होत असतांना मध्यमवर्गीय व गरिबांसाठी डॉ. सहस्रबुद्धे देवदूत आहेत. “आम्हाला त्यांचा गुण येतो म्हणजे येतोच असे अनेक रुग्ण सांगतात”. त्यांच्या क्लिनिक मध्ये सकाळपासूनच रांगा लागलेल्या असतात. काही पेशंटला 50 रुपये 20 रुपये तपासणी फी देणे शक्य नसते त्यांच्याकडून डॉक्टर काहीहि फी घेत नाही. मितभाषी अश्या माणसातल्या या देवाला डॉक्टर्स डे निमित्त सन्मानित करण्यात आले.
तसेच संस्थेस वेळोवेळी मदत करणारे डॉ. राजेश डाबी, डॉ. आनंद दशपुत्रे, डॉ. शेखर भावे यांना शुभेच्छा देवून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
डॉक्टर गिरीश सहस्रबुद्धे यांचा जो प्रातिनिधिक सत्कार केला तो समाजातील सर्वच डॉक्टरांचा असल्याचे संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले
अशी माहिती धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलतांना नितीन पारगावकर ,अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ – जळगाव यांनी दिली.