जळगाव — संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग हा अभ्यासक्रम डिप्लोमा साठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील हे दूरदृष्टीकोन असणारे तसेच शैक्षणिक दृष्टिकोन बाळगणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी ही विद्यार्थ्यांची व पालकांची काळाची गरज ओळखून गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग हा कोर्स उपलब्ध करून दिला. उत्तर महाराष्ट्रमधील गोदावरी पॉलिटेक्निक हे पहिले महाविद्यालय आहे की जिथे हा कोर्स शिकवला जाईल.आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या टेक्नॉलॉजीचा वापर आणि क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात एआय हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारं तंत्रज्ञान असू शकतं, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. याच कारणामुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रात एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.आणि म्हणूनच जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी हा अभ्यासक्रम डॉ. उल्हास पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे. गोदावरी पॉलिटेक्निक हे एक उत्तम व उच्च दर्जाचे महाविद्यालय असून त्याच्या विविध शाखांना अ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशांतर्गत तसेच विदेशात आपल्या खानदेश चे नाव उज्वल करीत आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या महाविद्यालयात उत्कृष्ट व्यवस्थापन, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, वातानुकूलित कॉम्प्युटर लॅब्स, इंट्रॅक्टिव्ह क्लासरूम, मुलींसाठी कॉलेज कॅम्पस मध्येच सुरक्षित वस्तीगृह, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वातानुकलीत ग्रंथालय, वायफाय कॅम्पस तसेच अभ्यासाव्यतिरिक्त मार्गदर्शन महाविद्यालयामध्ये दिले जाते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच गोदावरी पॉलिटेक्निकचे समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहेत तरी विद्यार्थ्यांनी अधिक माहीतीसाठी महाविद्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहेे.