Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यानिर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन

निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन

. मोहन वाघ
विभागीय कृषि सहसंचालक नाशिक

जळगाव, दि. २८ :- महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादन पिकांच क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातुन तसेच नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात विशेषत द्राक्ष, केळी, आंबा डाळिंब व इतर फळ पिकाची तसेच कांदा, भेड़ी व इतर भाजीपाला पिकांची अपेडाच्या सहकार्याने निर्यात यूरोपियन यूनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते.

राज्यातून फळ व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशाच्या किडनाशक उर्वरित अश व किड रोग मुक्तची हमी देण्यासाठी सन २००४-०५ पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची यशस्वीपण अंमलबजावणी करण्यात येत आहे. नियांतीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांची नोदणी तपासणी किड व रोगमुक्त हमी, अंगमार्फ प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबीचे ट्रेसबीलीटीनेट प्रणालीदार प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागात सन २०२३-२४ मध्ये द्राक्षाची ग्रेपनेट प्रणालीवर २८६२४. आंब्याची मँगोनेट प्रणालीवर १३८. भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर १६५. केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर २०१ प्लॉटची नोंदणी झाली हाती. नाशिक विभागात सन २०२३-२४ मध्य हॉर्टीनेट प्रणालीवर एकूण २९१९५ शेतकऱ्यांची शेत नोंदणी झालो होतो. राज्यामध्ये नाशिक विभाग निर्यातक्षम शेत नोदणीत प्रथम स्थानी आहे.

सन २०२४-२५ वर्षामध्ये फळ व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषि विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषि माल नियांत मागदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाईन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशनची माबाईल अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. निर्यातीबरोबरच स्थानीक बाजारपेठेत ग्राहकांना किड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागाला या वर्षी एकूण ४६९९० जागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आल आह
नोदणी करण्यास ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरु आहे.
सन २०२४.२८ मध्ये द्राक्ष पिकाची शेत नोंदणी १ सप्टेंबर व आंबा पिकाची १ डिसेंबर रोजी सुरु होणार असुन इतर पिकाची नोंदणी वर्षभर सुरु असते. सन २०२४-२५ मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलीटी नेटव्दारे नोंदणी करण्याकरीता नाशिक जिल्हा ४५०९०, धुळे जिल्हा ३५०. नंद‌वार जिल्हा ३५० व जळगाव जिल्हा १२०० असा एकूण ४६९९० लक्षांक जिल्ह्याना वितरीत करण्यात आलेला आहे. द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत, आंबा बागांची नोदणी करण्यास ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरु आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सध्य स्थितीत शेत नोंदणी अत्यंत अल्प झाली असून शेत नोंदणी करण्यासाठी व निर्धारित लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी निर्यातक्षम पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी. अधिक माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालु‌का कृषि अधिकारी कायालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ यांचेh मार्फत करण्यात येत आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या