Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeक्रीडाक्रीडा प्रबोधिनीतील प्रवेशासाठी आवाहन

क्रीडा प्रबोधिनीतील प्रवेशासाठी आवाहन

जळगाव, दि. २८ :- शिव छत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधणी मध्ये सन २०२४-२५ करिता सराव व कौशल्य चाचणी निवासी व अनिवासी खेळाडू करिता नवीन प्रवेश देणे सुरू होत आहे.
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूची निवड करून त्यांना संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवणे सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे शिव छत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगी बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत आहे. सदर प्रबोधनी प्रवेशाकरिता ५०% सरळसेवा व ५०% कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. त्या करिता खालील नियम व अटी शर्ती राहनार आहे.

१राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठीकाणी क्रीडा प्रबोधनी निवड प्रक्रीया देणार आहे.
२खेळ प्रकार :- ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटीग, फुटबॉल, जलतरण, अंथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टरों अशा एकूण १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण दिले जाईल.
प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्या चाचणी करिता अटी प्रवेश देण्यात येईल.
सरळ प्रेवश :- क्रीडा प्रबोधनीतील असलेल्या संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनीधीत्व केलेले खेळाडू ज्याचे वय हे १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडून संबधित खेळाच्या चाचणीत समिती समक्ष देऊन प्रा देण्यात येईल.
खेळ निहाय कौशल्या चाचणी:- क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या खेळ प्रकारात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू ज्याचे वय १९ वर्ष आहे.अशा खेळाडून संबधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्या चाचणीचे आयोजन करुन गुणनुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल. ३) वैदयकीय चाचणी :- उपरोक्त चाचणी मधून निवड झालेल्या खेळाडूस वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर निवड होईल.
सदर अटी शर्थीनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव या ठिकाणी जिल्हास्तरवर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळांडूनी त्यांची नोंदणी करण्या करीता ५ जुलै २०२४ पर्यंत संपर्क साधावा. त्यानंतर विभागीय क्रीडा प्रबोधिनी चाचण्याचे आयोजन हे ८ ते ९ जुलै या दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे संकुल या ठिकाणी आपली प्रवेशिका दोन दिवस आगोदर सादर करावी त्यानंतर निवड चाचणीतून पात्र ठरलेल्या खेळाडूची राजयस्तर निवड चाचणी / कौशल्य विकास चाचणी ही संबधित खेळ प्रबोधणीत किंवा पुणे या ठिकाणी १५ ते१६ जुलै दरम्यान घेण्यात येईल. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. सदर बाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव येथील क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांचेशी संपर्क साधावा. (टिप जन्माचा दाखला आणि क्रीडा प्रमाणपत्रे आवश्यक आहे)

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या