जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैनंदिन शिवविचार जाणून घेण्यासाठी हिंदवी स्वराज्य ऍप ची निर्मिती करण्यात आली असून आज अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन होताच उपस्थित सर्वानी आणि विशेष उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरदारांचे वंशज यांनी देखील लगेचच क्यू आर स्कॅन करून ऍप डाउनलोड केले. हा उपक्रम खूपच स्तुत्य असल्याचे चर्चा परिसरात होती.
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन सुरु झाले असून आज गुरुवार दिनांक २७ जून रोजी मंचावर उपस्थित श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि श्री विजयराव देशमुख यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य ऍप चे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी मंचावर श्रीमंत शिवाजी राजे भोसले, श्री विजयराव देशमुख, स्वागताध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे श्री अशोकभाऊ जैन, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, कार्याध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील, स्वागत सचिव किरणदादा बच्छाव, योगेश भोईटे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख, इतिहास प्रबोधन महाराष्ट्र चे विश्वस्त रवींद्र पाटील, भारतीताई साठे, पवन सर आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्याचे वंशज येथे उपस्थित झाले होते. यात हंबीरराव मोहिते यांचे १४ वे वंशज विशाल मोहिते, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज कुणालजी मालुसरे, धनाजी राजे शिरके, रवीजी जगदाळे, बावणे सरदार, नेताजी पालकर यांचे वंशज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ. प. अनिकेत महाराज मोरे उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि श्री विजयराव देशमुख यांच्या हस्ते ” हिंदवी स्वराज्य ” ऍप चे उद्धघाटन मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . ऍप चे उद्धघाटन होताच महाराजांच्या सरदारांच्या घराण्याचे वंशजांनी त्वरित ” हिंदवी स्वराज्य ” ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केले. या कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांनी सुद्धा आपापल्या मोबाईल मध्ये हे ऍप डाउनलोड केले. संमेलन स्थळी असलेल्या स्टँडी वरून युवक मोठ्या प्रमाणात ” हिंदवी स्वराज्य ” ऍप डाऊनलोड करत आहेत. सदर ऍप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.