जळगाव :- कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सलग्न सर्व शाखेचे नाशिक विभागीय बैठकीचे आयोजन दिनांक 30 जून 2024 रोजी जळगांव येथील पत्रकार भवन तहसील कार्यालय जवळ सभागृहात करण्यात आले आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या नाशिक विभागाअंतर्गत जळगाव धुळे नाशिक नंदुरबार जिल्हास्थरीय बैठकिसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पारवे अतिरिक्त राज्य सरचिटणीस हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. गणेश मडावी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तसेच सुमित भुईगळ महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुरेश तांबे महासचिव, रवींद्र तायडे नाशिक विभागीय अध्यक्ष हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी जलसंपदा पाटबंधारे विभाग तसेच कास्ट्राईब कर्मचारी महानगरपालिका या नवीन शाखेचे फालकाचे उद्घाटन तसेच कार्यकारणी जाहीर करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखेचे सदस्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष बापू साळुंखे , माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष डाँ.संजय निकम, कास्ट्राईब जिल्हा परिषद संघटनेचे रवींद्र सोनवणे,कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप बोदडे , कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे, कार्याध्यक्ष योगेश अडकमोल,महसूल कर्मचारी संघटनेचे विलास डोंगरे, कास्ट्राईब कोषागार विभागाचे आनंदकुमार मानकर, नंदू गायकवाड आदिनी बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सलग्न सर्व शाखेचे नाशिक विभागीय बैठकीचे जळगावात आयोजन
अधिक वाचलेल्या बातम्या