Monday, December 23, 2024
Google search engine
Homeजळगाव जिल्हाऔद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे २७ जुन, रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे २७ जुन, रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन


जळगाव, दि. २५ :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुन, २०२४ रोजी सकाळी १०:३० दुपारी २: ३० वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नोकरी इच्छुक उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी, १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सब ट्रेड धारक/सर्व डिप्लोमा धारक / असे एकूण १५० रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविलेले आहे- सदरील प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या ठिकाणी करण्यांत आलेले आहे.

तरी रोजगार मेळाव्यात नमूद पात्रता धारक केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्याwww.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लॉय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग ईन करुन अप्लॉय करावा. तसेच, ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. व विभागाच्या www.mahaswayam.gov.in /www.ns.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखिल करुन घ्यावी,याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार एम पंतम, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

मेळाव्याचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मेस हॉल नॅशनल हायवे क्रमांक ०६ ता. जि. जळगाव. (चंद्रकांत दुसाने) क. मार्गदर्शन अधिकारी कौशल्य विकास रोजागर व उद्योजकता जळगाव यांनी केले आहे

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या