जळगांव,दि. 25 -जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव या अभिकर्ता संस्थेच्या वतीने २६ जून, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता चिंचोली शिवारातील गोदामात उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांचे हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन आयोजित केलेले आहे. यावेळी जळगाव तालुक्याच्या तहसिलदार, शितल राजपुत व गोदामपाल श्रीकांत माटे यांचे उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. तरी यावेळी जळगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवानी ऑनलाईन ज्वारीची नोंदणी केलेली आहे. त्यांना नोंदणीक्रमाने एस. एम. एस देवून खरेदीसाठी बोलविण्यात आलेले आहे. तरी शासकीय भरडधान्य ( ज्वारी) नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.
शासकीय भरडधान्य (ज्वारी) खरेदी केंद्रांचे आज उद्घाटन
अधिक वाचलेल्या बातम्या