जळगांव – गोरगरीब जनतेच्या आशेचा किरण असलेल्या जिल्हाभरातील शिव भोजन केंद्र चालक-मालक संघटनेची स्थापना करण्यात आली असून उत्तर महारष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी संजय शर्मा (जळगांव) व उपाध्यक्ष पदी मुन्ना सोनवणे (भुसावळ) याची एकमताने निवड करण्यात आली.
दि.२३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जळगांव येथील महात्मा गांधी उद्यानात जळगांव जिल्ह्यातील शिवभोजन चालक मालक संघटनेची विशेष बैठक बोलावण्यात आली व त्यात स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या नवीन संघटनेच्या माध्यमातून केंद्राला येत असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच केंद्र चालक-मालक यांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणार आहे.या बैठकीत जिल्ह्यातील उमाकांत/नमा शर्मा, सुनीता भावसार, संतोष गौड, ललीत पुजारी, अंबादास गोसावी, धनजय पाटिल, विजय चौधरी, शेखर चव्हाण, छाया कोरडे, परवेझ पठाण, रिजवान खान, पवन माळी, संतोष माळी, विलास चव्हाण, चंद्रकांत जाधव या सर्वांनी उत्तर महाराष्ट्र जळगांव जिल्हा शिवभोजन चालक – मालक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय शर्मा (जळगांव) व उपाध्यक्ष पदी मुन्ना सोनवणे (भुसावळ) याची एकमताने निवड केली.