Monday, December 23, 2024
Google search engine
Homeक्रीडाबँक ऑफ महाराष्ट्र तर्फे जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे जागतिक योग दिवस उत्साहात साजरा


जळगाव दि. 21 – दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगावातील बँक ऑफ महाराष्ट्र ने ऑफिसर्स क्लब जळगाव येथे जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले.

योग दिना साठी जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र. से.), बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह , सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील , ऑफिसर्स क्लब जळगाव चे सर्व सदस्य व बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव शहरातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

या योग शिबिरासाठी योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार व श्रीमती तनया पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार यानी योगा चे महत्व सांगीतले योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. त्याच बरोबर सर्वांनी योग करुण जागतिक योग दिवस साजरा केला. ऑफिसर्स क्लब जळगाव ने बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या