मुंदडाज मार्ट आजपासून ग्राहकांच्या सेवेत
जळगांव – शहरातील नवी पेठ परिसरात भारत दुग्धालया समोरील मुंदडाज मार्ट या नूतन फूड अँड आईस्क्रीम शॉपीचा शुभारंभ माजी महापौर श्री नितीनभाऊ लढ्ढा व सौ.अलकाताई लढ्ढा यांच्या शुभहस्ते दि.२१ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आला.
या प्रसंगी संचालक विष्णू मुंदडा यांचेसह परिवारातील ज्येष्ठ,कैलाश मुंदडा,श्रीकांत मुंदडा,भूषण मुंदडा,विनोद मुंदडा व मुंदडा परिवारावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
या नूतन फूड अँड आईस्क्रीम शॉपित सर्व दर्जेदार कंपनीचे फरसाण,वेफर्स,शेव,विविध प्रकारचे चॉकलेट्स व इतर खाद्यपदार्थ पॅकेट्स तसेच सर्व नामांकित कंपनीचे आईस्क्रीम पॅकस तसेच डिस्पोजल साहित्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या शुभारंभ कार्यक्रमाला नवी पेठ परिसरातील रहिवासी, व्यवसायिक,माहेश्र्वरी समाजातील मान्यवर गण,तसेच या परिसरातील सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठ गणेश मंडळ पदाधिकारी मनीषभाऊ झवर,प्रमोद अग्रवाल, शैलेश काबरा,राजुभाऊ दोशी दिपक लढ्ढा, गिरीष झवर, सुनील जोशी,अतुल वाणी,अमोल जोशी,ॲड नीरज गुजराथी, संकेत जाखेटे,सतीश वाणी,हेमंत चौधरी,मधुभाऊ चहावाले आकाश वाघ,यांचेसह सदस्यांनी तसेच नवी पेठ महिला मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून नूतन व्यवसायच्या वाटचालीला संचालक विष्णू मुंदडा व परिवाराला शुभेच्छा दिल्या.