जळगाव :- दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर 2024 हा काळ वनमहोत्सवचा काळ म्हणून दरवषी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. या व्यतिरिक्त केंद्र शासनाकडून अलिकडेच एक पेड माँ के नाम – Plant4 Mother” ही संकल्पना राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत९.
१५ ऑगस्ट २०२२ मध्ये आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाली असून अमृतकाळ सुरु झालेला आहे महाराष्ट्र राज्याने सुरु केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी, आणि प्रत्येकाचा यात सहभाग मिळावा तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतुने वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्र वनविभागामार्फत वनमहोत्सव काळात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजनेव्दारे प्रत्येक नागरिकास अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभाग घेता येऊ शकेल व पर्यावरण संवर्धनामध्ये सहभाग घेता येईल.
वृक्षारोपन व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होणेकरिता शाळा / महाविदयालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येईल तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना वृक्ष लागवडीसाठी लहान रोपे दर प्रति रोप 21/- रुपये तर मोठी रोपे दर 53/- प्रति रोप तसेच बांबू कंद प्रति कंद 08 रुपये व पिशवीतील बांबू प्रति रोपे 13/- या प्रमाणे सामाजिक वनीकरण जळगाव विभागामार्फत रोपे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या जळगाव जिल्हयात एकूण 16 रोपवाटीका असुन जळगाव मधील मेहरुन व कुंभारखोरी रोपवाटीका, चाळीसगाव मधील बिलाखेड रोपवाटीका, चोपडा मधील नारोद रोपवाटीका, भुसावळ स्थित मुक्ताईनगर मधील मुसळतांडा व निमखेडी रोपवाटीका, एरंडोल मधील चोरटक्की रोपवाटीका, जामनेर मधील गंगापुरी रोपवाटीका, पाचोरा मधील चिंचपुरा रोपवाटीका, पारोळा मधील मोढाळे रोपवाटीका, रावेर मधील पुनखेडा व लालमाती रोपवाटीका, यावल मधील यावल रोपवाटीका, अमळनेर मधील पळासदरे रोपवाटीका, भडगाव मधील कोठली व वलवाडी रोपवाटीका असुन त्याठिकाणी निम, शिसु, बांबू, आंबा, पेरु, सिताफळ, बकाम, वड, बेल, आवळा, चिंच, विलायती चिंच, गुलमोहर, काशिद, या प्रजातीची जोमदार व सुदृढ रोपे उपलब्ध आहेत. रोपे मागणीसाठी श्री. अनिल गोराणे, (9405058653) व श्री अमोल ढोबळे, (8806803446) यांचेशी संपर्क साधावा, असे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, संजय पाटील जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.