जळगांव – ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था व सकल ब्राह्मण समाजा तर्फे रविवारी दिनांक १६ जुन रोजी सायंकाळी ४ वाजता ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित केला आहे.
ज्या विद्यार्थ्यांची नावे संस्थेकडे दिलेल्या मुदतीत यादीमध्ये नोंदवले आहेत त्यानी या वेळी हजर राहून आपले शैक्षणिक साहित्य प्राप्त करावे व करियर विषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन
ब्रह्मश्री संस्था जळगाव तर्फे करण्यात आले आहे.
वरील कार्यक्रमचे आयोजन केसी इंग्लिश मिडीयम व कुलकर्णी क्लासेस, भोईराज भवन समोर, बाजार रोड, पिंप्राळा येथे करण्यात आले आहे.