जळगांव – शहरात आज दि.१५ जून रोजी महेश नवमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येत आहे.माहेश्र्वरी समाजातील समाजबांधव उत्साहाने सहभागी होवून त्या निमित्ताने वैविध्यपूर्ण अश्या धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहे.
काल दि १४ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ आदर्श नगरातील सोमेश्वर महादेव मंदिरातून सकाळी ९ वाजता शिव पूजनाने झाला.याप्रसंगी समजातील बांधवांनी एकत्र येवून या कार्यक्रमात योगदान दिले.तर सायंकाळीं ५ वाजता रिंग रोड वरील महेश चौकात मोठ्या संख्येने उपस्थिती देत मोटर सायकल रॅलीचा शुभारंभ केला.या प्रसंगी महीला व युवतींनी फेटा धारण करीत कार्यक्रमाच्या उत्साहात भर घातली.तेथूनच भव्य अश्या मोटर सायकल रॅलीचा प्रारंभ झाला.
जय महेशच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.ही रॅली संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करीत तिचा समारोप पुन्हा महेश चौकात झाला. शहर माहेश्वरी युवा संघटनेतर्फे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दी.१४ रोजी संध्याकाळी भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
आज दी.१५ रोजी महेश नवमी निमित्त शहरात आयोजित कार्यक्रम रूपरेषा
सकाळी ६ ते ७ या वेळेत रथ चौकात श्री बालाजी मंदिर येथे भगवान श्री महेश अभिषेक,शृंगार आरती.
सकाळी ८ वाजता पांजरपोळ येथे गो शाळेत गाईंची सेवा,शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप,
अयोध्या नगर शिव मंदिरात महा आरती व आंब्याची आरास केली जाणार आहे.पिंप्राळा प्रभागात
सकाळी १० ते १ फळांच्या रसाचे वितरण, माहेश्वरी बोर्डिंग येथे रक्तदान शिबिर,सायंकाळी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाने सांगता.अश्या श्री महेश नवमी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ
समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन जळगाव माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष अतुल कोगटा सचिव महेश सोनी यांनी केले आहे.