Friday, January 10, 2025
Google search engine
HomeBlog*सुदृढ,सक्षम राष्ट्राकरिता प्रत्येक मत अनमोल आहे

*सुदृढ,सक्षम राष्ट्राकरिता प्रत्येक मत अनमोल आहे

जळगाव – लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या उन आपल्या देशातील लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या असून मतदार पूर्णतः मतदानाला गांभीर्याने घेत नसल्याने बरेच ठिकाणी टक्केवारी घसरली आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यात चौथ्या चरणात १३ मे रोजी जळगाव व रावेर लोकसभेसाठी मतदान होणार असून जिल्हा प्रशासन निवडणूक विभाग तसेच विविध सामाजिक सेवाभावी संस्था मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अखंड जनजागृती करीत असून
आपल्या एका मताने जय, पराजयाचा इतिहास घडू शकतो आपले एक मत अतिशय शक्तिशाली असल्याने मतदार राजा म्हणून आपल्या मताला महत्त्व असून मतदान श्रेष्ठदान आहे.
आपल्या शारीरिक व्यंगत्वाला नजुमानता सतत सेवाभावी कार्य करणारे विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांची निवडणूक विभागाने जिल्हा आयकॉन म्हणून निवड केली असून ते आपल्या दिव्यांग गाडीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन करीत आहे. आर, एल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल परिसरात विशेष जनजागृती कार्यक्रम त्यांनी घेतला याप्रसंगी डॉ. दीपक पाटील, मतदान कार्यावर प्रबंध तयार करणारे स्वप्निल पालवे यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा आयकॉन मुकुंद गोसावी यांनी मतदानाचे महत्त्व विशद करून सुदृढ, सक्षम राष्ट्र करिता आपले प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याचे सांगून न विसरता मतदान करण्याचे आवाहन केले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या