जळगांव – दि.२४( धर्म साथी मीडिया नेटवर्क) शहरापासून नजिकच्या पाळधी येथे आज दि.२४ ते २६ डिसेंबर दरम्यान भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला ब्रह्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे..आजपासून उत्साहपूर्ण वातावरणात सुंदरकांड ने उत्सवाचा प्रारंभ होत आहे.
श्री सचिदानंद सदगुरू साईबाबा परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिराचा यंदाच्या वर्षी २२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे उत्स्फूर्त आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यात नाशिक येथील पंडित गया प्रसाद चतुर्वेदी हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजा अर्चना करणार आहेत.
परमपूज्य सु.श्री. अलका श्री संगीतमय सुंदर कांडद्वारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे दिनांक 24 रोजी संध्याकाळी ६ वाजता या विशेष कार्यक्रमाला प्रारंभ होईल.
दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता इंडियन आयडॉल थेंब नितीन कुमार यांचा भजन संध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान महा अभिषेक दुपारी ४ वाजता महाप्रसाद सेवा सुरू होईल तरी भाविक भक्तांनी या ब्रह्मोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा व इतर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवकीनंदन झवर, सुनील झवर, मधुकर झवर आदींनी केले आहे.