पारोळा येथील माजी उपनगराध्यक्ष, वि.का.सोसायटी अध्यक्ष तसेच भवानी गडाचे प्रेरणास्थान मंगेशअण्णा तांबे यांनी दि.२ मे रोजी भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते माजी खासदार ए.टी नाना पाटील , आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह, समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या मुळे पारोळा भाजपा संघटन अधिक मजबूत करून स्मिता ताई यांना मोठा लिड मिळवून देण्याची खात्री त्यांनीं या प्रसंगी आपल्या मनोगतातून प्रदेश अध्यक्षांना दिली.