Sunday, January 12, 2025
Google search engine
Homeताज्या बातम्याभाजपा मंडळ क्र. ०२ तर्फे योग दिवस पांझरापोळ गोशाळेत उत्साहात साजरा

भाजपा मंडळ क्र. ०२ तर्फे योग दिवस पांझरापोळ गोशाळेत उत्साहात साजरा

जळगांव – भारतीय जनता पार्टी मंडल क्र.2 महर्षि वाल्मीकि नगर तर्फे आंतरराष्ट्रीय योगादिवस आमदार सुरेश(राजुमामा) भोळे आणि महानगर जिल्हाध्यक्षसौ.उज्वलाताई बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळ क्रमंक ०२ चे अध्यक्ष राहुल घोरपडे यांच्या नेतृत्वाखालीडॉ.विकास निकम यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवस उपस्थितांना प्रशिक्षण देऊन साजरा केला
त्या वेळी महानगर पदधीकारी, महिला कार्यकर्त्या,युवा कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पांझरापोळ गोशाळेत सकाळी ८ ते ९.३० यावेळेत करण्यात आले होते.समाजाला योग साधनेचे महत्त्व समजावे व उत्तम आरोग्य साधनेकरिता योग क्रिया किती महत्वाची आहे याची सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
भाजपा मंडळ क्रमांक ०२ तर्फे आयोजित या सामाजिक व आरोग्य सेवेच्या उपक्रमात महानगर चिटणीस जयेश भावसार, मा.नगरसेवक दीपक सुर्यवंशी,विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी,शहर चिटणीस सौ.चित्रा मालपाणी,मंडळ क्रमांक ०२ महिला अध्यक्षा गीता नागला,युवा मोर्चा अध्यक्ष धीरज पुरोहित,मंडळ उप अध्यक्ष गणेश बाविस्कर,स्वप्नील चौधरी,अपर्णा भालोदकर,कल्पेश खैरनार,गुड्डू बागरे,
दीपिका खैरनार, यांचेसह अनेक कार्यकर्ते,नागरिक सहभागी झाले होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या