जळगांव – शहरातील मुक्ताईनगर परिसरातील श्री हनुमान मंदिरात आज दि.१२ जानेवारी रोजी सकाळी जागतिक पारायण दिनानिमित्त श्री गजानन महाराज यांचे पूजन व सामूहिक पारायण कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी श्रींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नैवद्य दाखवण्यात आला.ब्रह्मश्री संस्थेच्या श्री अशोक भाऊ वाघ ,डॉ.निलेश राव यांचेसह पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.त्यांनी सामूहिक पारायणात उत्स्फूर्त सहभाग घेतला..श्री गजानन महाराज यांचे पारायण झाल्यानंतर महाआरती करण्यात आली.प्रसाद वाटप करण्यात आला.
ब्रह्मश्री तर्फे जागतिक पारायण दिन उत्साहात साजरा…श्री गजानन महाराजांचे सामूहिक पारायण..
अधिक वाचलेल्या बातम्या