जळगांव – दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील होतकरू महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या उद्यमशीलतेला प्रेरणा देणाऱ्या विश्वशांती समूहाच्या वतीने दि.१९ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी निमित्त संगीत संध्या व स्नेह मिलन मेळावा कार्यक्रमाचे आयोजन पदाधिकारी व सदस्यांचे वतीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते.या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात तुज मगितो मी आता, मथुरेच्या बाजारी अशा बहारदार गाण्यांनी विश्वशांती समुह आयोजित कोजागिरी संगीत संध्येचा कार्यक्रम सुरू झाला. .विश्वशांती समुहाने आयोजित विशेष कार्यक्रमात सुरुवातीला संस्कृती पंकज पवनीकर हीने पसायदान यावर विवेचन सादर केले. संस्कृतीने सोप्या भाषेत पसायदानाच्या सर्व ओव्यांचा अर्थ समजावून सांगत उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर अनुजा मंजुळ हीने सुमधुर भावगीते सादर केली. संस्कृती पवनीकर,आदिती काळकर व सौ तृप्ता वाघमारे यांनी देखील सुमधुर गाणी सादर केली. त्यानंतर पुरुष मंडळींची संगीत खुर्ची घेण्यात आली त्यात समर्थ काळे विजयी झाला. टीप-यांवर महिलांनी ताल धरला तसेच भुलाबाईची गाणी सादर करण्यात आली.
सौ.मंजूषा पवनीकर यांनी बहारदार सुत्रसंचालन केले तर आभार स्वप्ना काळे यांनी मानले. कार्यक्रमात संस्कृती पवनीकर हीचा सत्कार गिरीश कुलकर्णी यांनी तर अनुजाचा सत्कार जयश्री जोशी,आदिती काळकर हिचा सत्कार गालफडे यांनी केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सुचिता कुलकर्णी,गिरीश कुलकर्णी,सौ पल्लवी भंडारी, भूषण भंडारी,सौ.रेवती राजहंस,सौ.तृप्ता वाघमारे तसेच सौ.मंजू तोंडुलकर अनंत तोंडुलकर,चित्तरंजन जोशी,भावना जोशी विदूला काळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.